/AV News Bureau:
लावणी कलावंत महासांघाचा 3 रा वर्धापन दिन सोहळा आणि 4 था लावणी गौरव पुरस्कार सोहळा नुकताच परळच्या दामोदर हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमात शहाजी काळे आणि माया जाधव यांच्या जीवनावर प्रा.किसनराव कुऱ्हाडे पाटील यांनी लिहिलेल्या ‘शाहजीची माया’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळयात पौलमी मुखर्जी आणि चारुशिला गोलम यानी कथक आणि लावणीची जुगलबंदी, नृत्य दिग्दर्शक आशीष पाटील, लावणी सम्राज्ञी सीमा पोटे, सुधाकर पोटे, प्रियांका शेट्टी या दिग्गज कलावंतांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. तर चंद्रकांत शिंदे,विजय कर्जावकर,नम्रता वेस्वीकर,पुजा सावंत यांनी गायनाने, शाहीर सीमा पाटील यांचा पोवाडा आणि नयना रणदिवे,अंबिका,मोना, संदेश ग्रुप,प्रमोद ग्रुप,हंकारे ग्रुप यांच्या नृत्याने कार्यक्रमात चांगलीच बहार आणली.
या कार्यक्रमाला मेघराज राजे भोसले (अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), शहाजी काळे (जेष्ठ अभिनेते), माया जाधव (जेष्ठ अभिनेत्री), कथक गुरु पौलमी मुखर्जी, समाजसेविका चारुशिला गोलम, विजय पाटकर (सिनेअभिनेता), जयवंत वाडकर(सिनेअभिनेता), मेघा घाड़घे (सिनेअभिनेत्री) , मछिन्दर चाटे (निर्माता), प्राची चेवुलकर (सिनेअभिनेत्री), डि महेश (कॉमेडियन), देवेंद्र भुजबळ (माहिती जनसपंर्क प्रमुख महाराष्ट), नगरसेविका यामिनी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या रंगारंग कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विकास सोनावणे, दिनेश कोयडे तर प्रस्ताविक कार्याध्यक्ष चंद्रकांत बारसिंगे, आभार सरचिटणीस जयेश चाळके यांनी केले.
२०१७ चे लावणी गौरव पुरस्कार प्राप्त
- मंगला बनसोडे
- प्रा. गणेश चंदनशिवे
- सुधाकर पोटे नारायनगावकर
- केशर जैनु शेख
- बापू मोरे
- प्रियांका शेट्टी
- शहाजी जाधव