मुंबई, 10 जून 2017/AV News Bureau:
रेल्वे मार्गाची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मेन लाइन
मुलुंड-माटुंगा अप स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या काळात मेगाब्लॉक
- सकाळी 58 ते दुपारी 4.03 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील सर्व गाड्या मुलुंड-माटुंगा स्थानकांच्या दरम्यान अप फास्ट मार्गावरून चालविल्या जातील तसेच मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन रेल्वे स्थानकांमध्ये त्यांना थांबा देण्यात येईल. त्यानंतर माटुंगा स्थानकापासून अप स्लो मार्गावरून या गाड्या चालविण्यात येतील.
- अप स्लो मार्गावरील गाड्या नाहुर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना भांडुप, विक्रोळी आणि कुर्ला रेल्वे स्थानकावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- सकाळी 08 ते दुपारी 2.42 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या डाउन फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबविण्यात येतील. या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
- सकाळी 22 ते दुपारी 3.28 या काळात ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या अप फास्ट मार्गावरील गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबविण्यात येतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
- सकाळी 11ते दुपारी 30 यी काळात सीएसटीहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या स्लो मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक
सीएसटी-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर लाइनवर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या काळात तसेच चुनाभट्टी/वांद्रे-सीएसटी अप हार्बर लाइनवर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या काळात मेगाब्लॉक
- सकाळी 21 ते दुपारी 4.39 या काळात सीएसटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या गाड्या तसेच सकाळी 10.38 ते दुपारी 4.43 या काळात सीएसटी ते वांद्रे, अंधेरीसाठी सुटणाऱ्या गाड्या बंद राहणार आहेत.
- सकाळी 52 ते दुपारी 3.26 या काळात पनवेल,बेलापूर, वाशीहून सीएसटीला सुटणाऱ्या अप मार्गावरील गाड्या तसेच सकाळी 10.44 ते दुपारी 4.13 या काळात अंधेरी, वांद्रेहून सीएसटीला सुटणाऱ्या अप मार्गावरी गाड्या बंद राहतील.
- या मेगाब्लॉकच्या काळात सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 6 या काळात ट्रान्सहार्बर तसेच मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.