मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांची कबूली
मंदसौर, ८ जून २०१७:
मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळेच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबूली मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी आज दिली. पोलिसांनी गोळीबार केला नसल्याचे वक्तव्य भूपेंद्र सिंह यांनी आधी केले होते. त्यामुळे गदारोळ माजला होता. आपण प्राथमिक अहवालानंतर वक्तव्य केल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले.
कर्जमूक्तीसह आपल्या विविध २० मागण्यांसाठी मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन हिंसक झाल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहात यांनी या याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले आहेत.