मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर अधिवेशनात घोषणा
नागपूर, 7 डिसेंबर 2016/ AV News Bureau :
रेशन दुकानांवरील धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी धान्य वितरणाची पद्धती बायोमेट्रिक करण्यात येणार असून यासाठी लवकरच सर्व रेशन दुकानदारांना पीओएस मशिन (POS Machine) देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात दिली.
वसई जिल्हा पालघर तालुक्यात शिधावाटप धान्याचा काळाबाजार होत असल्याबाबतचा प्रश्न आमदार क्षितीज ठाकूर यांनी सभागृहात उपस्थित केला होता.
राज्यातील धान्य वितरणाची पद्धती बायोमेट्रिक करण्यात येत असून आतापर्यंत सर्व रेशन शिधापत्रिका आधार सिडींग करत असताना एक कोटीपेक्षा अधिक रेशनकार्ड बनावट असल्याचे आढळून आले आहे. तर 70 लाख लाभार्थी कमी झाले आहेत. रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी धान्य वितरणाची संपूर्ण पद्धत बायोमेट्रिक करण्यात येत आहे,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.