पावसाळ्यासाठी सिडकोचा आपत्ती नियंत्रण कक्ष

नागरीकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन व वॉट्सॲप क्रमांक जारी

नवी मुंबई, 1 जून 2017/AV News Bureau:

सिडको अधिकारक्षेत्रात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीच्यावेळी नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी सिडकोने आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात हा आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. तसेच नागरीकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन व वॉट्सॲप क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.

आपात्कालीन कक्षाद्वारे खालील तक्रारींची दखल घेण्यात येणार आहे .

  • वृक्षांची पडझड/वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी,
  • रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे सुरक्षित करणे,
  • पुर/पुरसदृश्य स्थिती,
  • रस्त्यांची दुरावस्था,
  • रोड व नाल्याजवळील साचलेला कचरा,
  • व्यक्तिंचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे,
  • आग व आगीचे विविध प्रकार,
  • साथीचे रोग
  • विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी,
  • इमारत कोसळणे,
  • भूस्खलन होणे.

नागरिकांना तक्रारीसाठी पुढील क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  • एमटीएनएल क्र. 022-27562999
  • फॅक्स क्र. 022-67918199
  • वॉट्‌सॲप क्र. 8879450450
  • नागरीकांसाठी क्लाऊड क्र.022-39216299