पनवेल महापालिका निवडणुकीत ‘नोटा’च्या पर्यायाला पसंती
स्वप्ना हरळकर,नवी मुंबई
26 मे 2017/AV News Bureau:
26 मे2017: पनवेल महापालिका निवडणुकीत पनवेलकरांनी आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केले. मात्र काही पनवेलकरांना एकही उमेदार पंसत पडलेला नाही. आपल्या ‘नोटा’ अधिकाराचा वापर करीत त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत. एकीकडे 55 टक्के मतदान झाल्याचे समोर आलेले असताना आता तब्बल 19 हजार 857 पनवेकरांनी कुठल्याच उमेदवाराला मतदान न करता ‘नोटा’पसंती दिली आहे. मतमोजणीनंतर ही माहिती समोर आली आहे.
पनवेल महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये एकूऩ 4 लाख 25 हजार 464 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 96 हजार 790 मतदार महिला आहेत तर 2 लाख 28 हजार 674 मतदार पुरूष आहेत. त्यापैकी 2 लाख 33 हजार 095 मतदरांनी मतदान केले. त्यामध्ये 1 लाख 4 हजार 737 महिला तर 1 लाख 28 हजार 358 पुरूष मतदारांनी मतदान केले होते. मतदानाचा हा आकडा 55 टक्के पर्यंत पोहोचला. त्यामुळे पहिल्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान चांगले झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र आज निकाल जाहिर झाल्यावर नोटा (None of the above) म्हणजेच वरीलपैकी एकही उमेदवार नाही या पर्यायाला हजारो मतदारांनी पसंती दिली आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये तब्बल 1 हजार 527 मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वात कमी म्हणजे 543 मतदारांनी नोटाचा वापर केला आहे.