नवी मुंबई, 26 मे 2017/AV News Bureau:
नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत भाजपने शेकाप आघाडीला चांगलेच लोळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपसाठी आणि खासकरून माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली ही लढाई त्यांनी जिंकली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा एकदा घोर निराशा आली आहे. शेकापलाही भाजपच्या मुसंडीने धक्का बसला आहे. भाजपशी युती तोडून स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही तर मनसे अजून चाचपडतच असल्याचे पनवेल महापालिका निवडणुकींच्या निकालावरून स्पष्ट होत आहे.
78 जागांपैकी भाजपने रिपाइंला सोबत घेत तब्बल 51 जागांवर विजय मिळवला आहे. तर पनवेलकरांनी शेकाप आघाडीला कमी पसंती दिल्याचे निकालातून समोर आले आहे, 48 जागांपैकी शेकापला 23 जागाच जिंकता आल्या तर 18 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला आणि 12 जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 जागांवरच विजय मिळवता आला. त्यामुळे या दोन्ही पक्षांना पुन्हा उभारी घेण्यास बराच कालावधी लागणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली.
- पनवेल महापालिका निवडणुकीत उतरलेल्या 418 उमेदवारांचे भवितव्य आज स्पष्ट झाले. प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे-