51 जागांसह सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा
शेकाप- 23, राष्ट्रवादी काँग्रेस-2, काँग्रेस-2
नवी मुंबई, 26 मे 2017/AV News Bureau:
पनवेल महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सूरु असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा निर्णय हाती आला आहे. पनवेलकरांनी 78 जागांपैकी तब्बल 51 जागा भाजप-रिपाइंच्या पारड्यात टाकल्या आहेत. सर्वात अधिक जागा पटकावल्यामुळे पनवेल मापालिकेतील सत्ता स्थापनेचा भापजपचा मार्ग मोकळा झाला आह. महाआघाडी करणाऱ्या शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरसकट 27 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर भाजपशी युती नाकारणाऱ्या शिवसेनेला खातेही उघडता आलेले नाही.
- एकूण जागा -78
- भाजप-51
- शेकाप-23
- काँग्रेस-2
- राष्ट्रवादी काँग्रेस-2