नवी मुंबई, 26 मे 2017/AV News Bureau :
रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीची मतमोजणी आता काही वेळातच सुरूवात होणार आहे. पनवेलमध्ये एकूण 55 टक्के मतदान झाले आहे. 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत. पनवेल महापालिकेत कोणाची सत्ता येणार यावर आजच्या मतमोजणीनंतर शिक्कामोर्तब होणार आहे.
पनवेल महापालिकेसाठी भाजप आणि शेकापमध्ये प्रामुख्याने जोरदार चुरस आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापसोबत महाआघाडी केली आहे. तर शिवसेना भाजपसोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेली आहे. त्यामुळे भाजपने आठवलेंच्या रिपाइंसोबत निवडणूक लढवली आहे.
आज मतमोजणीच्यावेळी कोणतीही गडबड होवू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त दर्जाचा एक अधिकारी, 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 154 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 1304 पोलीस कर्मचारी तसेच राज्य राखवी पोलील दलाची तुकडीही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
- वाचा : पनवेल महापालिका निवडणुकीशी संबंधित आधीच्या काही बातम्या
- पनवेल निवडणूक :सकाळी 9.30 पर्यंत10 टक्के मतदान
https://goo.gl/7bguP7 - पनवेलमध्ये 11.30 पर्यंत 23 टक्के मतदान
https://goo.gl/MRwQOF - पनवेलचा पारा 36 अंश सेल्सिअस
https://goo.gl/eCByIf - पनवेल निवडणूक : दुपारी 1.30 पर्यंत 34 टक्के मतदान
https://goo.gl/9qoLGy - पनवेल निवडणूकः दुपारी 3.30 पर्यंत 42 टक्के मतदान
https://goo.gl/5ldqqd - पनवेलमध्ये 55 टक्के मतदान
https://goo.gl/ZawfSb - 1 लाख 92,369 मतदारांची मतदानाकडे पाठ
https://goo.gl/MNkgKl