1 लाख 92,369 मतदारांची मतदानाकडे पाठ

92 हजार 53 महिला तर 1 लाख 316 पुरूष मतदारांचा अनुत्साह

नवी मुंबई, 25 मे 2017/AV News Bureau:

सर्वांचे लक्ष लागलेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत तब्बल 1 लाख 92 हजार 369 मतदारांनी मतदान केले नसल्याचे समोर आले आहे. यामध्येेेे 92 हजार 53 महिला तर 1 लाख 316 पुरूषांनी मतदान केले नाही.  तब्बल 45 टक्के लोकांनी मतदान न केल्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 55 इतकी नोंदली गेली.

पनवेल महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये एकूण 4 लाख 25 हजार 464 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 96 हजार 790 मतदार महिला आहेत तर 2 लाख 28 हजार 674 मतदार पुरूष आहेत. प्रथमच महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे मतदार उत्साहामध्ये मतदानासाठी उतरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे कित्येक आपल्या कुटुंबांसमवेत गावी अथवा फिरण्यासाठी गेले आहेत. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले असावे. त्याचा परिणाम पहिल्या वहिल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत 55 टक्केच मतदान झाले तर 45 टक्के लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे आढळून आले आहे.  त्यामुळे अनेक प्रभागांमधील मतदानाची टक्केवारी घसरली असून त्याचा फटका उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे.

  •  स्त्री आणि पुरूषांनी मतदानाकडे पाठ फिरवली. त्याची प्रभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-

no vote 1

अनेक प्रभागांमध्ये मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून येते तर अनेक प्रभागांमध्ये ही टक्केवारी 70 ते 80 टक्यांपर्यंत गेल्याचे दिसून येते.

सर्वात कमी टक्केवारी प्रभाग क्रमांक 4 मध्ये 41 टक्के इतकी कमी नोंदली गेली तर सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 84 टक्के इतकी नोंदली गेली.

  • प्रभाग आणि कमी झालेली टक्केवारी पुढीलप्रमाणे –

percentage