पनवेल निवडणूकःदु.3.30पर्यंत 42 टक्के मतदान

पनवेल, 24 मे 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी मतदारांमध्ये  उत्साह दिसून येत आहे. मतदान आता शेवटच्या टप्प्याकडे झुकले असून दुपारी 3.30 पर्यंत मतदानाचा आकडा 42 टक्यांपर्यंत पोहोचला आहे. आता उरलेल्या शेवटच्या दोन तासांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सायंकाळी 5.30 ला मतदान प्रक्रिया थांबविण्यात येणार आहे.

सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानारांनी आपापल्या प्रभागातील मतदान केंद्रांवर हजेरी लावण्यास सुरूवात केली होती. दुपारपर्यंत मतदानाचा आकडा उत्तरोत्तर वाढत आहे. सकाळी 9.30 पर्यंत 10 ते 11 टक्के मतदान झाले होते. तर 11.30 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का 23 पर्यंत पोहोचला होता. दुपारी तिसऱ्या टप्प्यापर्यंत हेच मतदान 34 टक्क्यांपर्यंत पोहोचला. आता 3.30 पर्यंत मतदानाचा हा आकडा 42 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

विशेष म्हणजे उन्हाचा ताप असतानाही मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाला हजेरी लावत पनवेल महापालिकेसाठी आपण उत्सुक असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  • दुपारी 3.30 पर्यंत झालेल्या मतदानाचा तपशिल पुढीलप्रमाणे

list4

 

  • पनवेल महापालिका संबंधित इतर बातम्या
  • पनवेल निवडणूक :सकाळी 9.30 पर्यंत10 टक्के मतदान
    https://goo.gl/7bguP7
  • पनवेलमध्ये 11.30 पर्यंत 23 टक्के मतदान
    https://goo.gl/MRwQOF
  • पनवेलचा पारा 36 अंश सेल्सिअस
    https://goo.gl/eCByIf
  • पनवेल निवडणूक : दुपारी 1.30 पर्यंत 34 टक्के मतदान
    https://goo.gl/9qoLGy