गुजराती व मारवाडी समाजाच्या स्नेहमेळाव्यात शक्तीप्रदर्शन

 पनवेल, 18 मे 2017/AV News Bureau:

पंतप्रधान नरेंद्र मादी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या दूरदॄष्टी कार्य्रक्रमातून सर्व समाजाचा विकास साधला जात आहे.  त्यामुळे  सर्व समाजाचा जनाधार भाजपला मिळत आहे. खारघर येथे झालेल्या स्नेहमिलन  मेळयात  परिसरातील गुजराती व मारवाडी समाज बांधवांनी शक्तीप्रदर्शन करीत भाजपाला साथ असल्याची ग्वाही दिली.

रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार योगेश सागर, कोकण संघटक सतीश धोंड, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत खारघर सेक्टर 20 मध्ये गुजराती व मारवाडी समाजाचा स्नेहमिलन सोहळा बुधवारी पार पडला.

या सोहळ्यास उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, मुंबर्इ महानगरपालिकेचे नगरसेवक गणेशभार्इ पटेल, नगरसेविका केसरबेन पटेल, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल,समाजाचे  नेते राजाभाई रावरिया, कांतीभार्इ पटेल, प्रविणभार्इ पटेल, कांजीभाई पटेल, गणेशभार्इ चौधरी, आश्विनभाई पटेल,  बीना गोगरी, गीता चौधरी, दीपक शिंदे, मोना अडवाणी, साधना पवार, विपुल चौटालिया, कुणाल संघानी, मुकेश अग्रवाल, आशिष पटेल, प्रतीक्षा कदम यांच्यासह भाजप आरपीआय युतीचे उमेदवार उपस्थित होते.

marwadi

 

देशात आणि राज्यात विविध निवडणुकांमध्ये विकासाच्या वाटचालीसाठी भाजपला विजय मिळालेला आहे. पनवेलची पहिली महानगरपालिका निवडणूक असल्याने या महानगरपालिकेत भाजपाची सत्ता यावी यासाठी आम्ही सर्वजण कामाला लागलोय. भाजपाला पनवेलकर बहुमत देतील असा मला विश्वास आहे. –  प्रकाश महेता , पालकमंत्री रायगड 

 

खारघर,कामोठे आणि कळंबोली या सिडकोच्या मोठ्या वसाहती ग्रामपंचायती होत्या त्यांचा समावेश करून पनवेल महानगरपालिका करून विकासाकडे वाटचाल करावी अशी आमची मागणी भाजप सरकारने मान्य केली. रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांचे सहकार्य  मिळाले. महापालिका ही बुलेट ट्रेन असल्यामुळे पनवेलचा विकास आता वेगाने होईल. त्यासाठी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार महापालिकेतही सत्तेत आणा. – आमदार प्रशांत ठाकूर