मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाड्यापर्यंत रस्ते तयार करण्याचे नियोजन करण्याचे आदेश
पालघर,18 मे 2017/AV News Bureau :
कुपोषणाचा संबंध हा दळणवळाणाशी (connectivity) आहे. त्यामुळे प्रत्येक पाड्यापर्यंत रस्त्याचे नियोजन करावे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधी शासनामार्फत देण्यात येईल. पालघर जिल्ह्यातील ज्या भागात कुपोषण आहे त्याठिकाणी अधिक लक्ष देवून प्रशासकीय यंत्रणेने काम करावे .पुढील दोन तीन महिने अंत्यत म्हत्वाचे असून कुपोषण होवू नये यासाठी ठोस नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
फॅल्गशीप कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृह तलासरी येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
फॅल्गशीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून नियोजित वेळेत उदिदष्ट पूर्ण केल्यास त्याचा चांगला परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर झालेला दिसून येतो. म्हणून फॅल्गशीप कार्यक्रमाची सर्व संबंधित विभागाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच अमृत आहार योजनेअंतर्गत ज्या बालकांना लाभ दिला जातो त्यांची पूर्व आणि नंतर होणा-या शारिरिक बदलाची नोंद ठेवली पाहिजे. झालेले बदल आपणास ते दृश्यस्वरूपात दाखविता आली पाहिजे तरच योजना यशस्वी झाली असे म्हणता येईल. विविध येाजना कल्पकतेने राबवाव्यात. सरकारी विभागांना देण्यात आलेले उदिदष्ट पूर्ण करावे. जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावी यासाठी संबंधित विभागाच्या सचिवांनी विशेष लक्ष द्यावे,असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.