पनवेल, 3 डिसेंबर 2016 / AV News Bureau :
पनवेल तालुका भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
यावेळी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी उपनगराध्यक्ष संतोष शेट्टी, माजी आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, युवा नेते जाकीर खान आदी उपस्थित होते.
भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी सुगंधा कोळी, नर्मदा आदईकर, सरचिटणीसपदी यशोदा पाटील, कुंदा मेंगडे, चिटणीसपदी जयश्री कोळी, स्नेहलता ठाकूर, संगिता पाटील, रेश्मा शेख, इंदुमती पाटील, ज्योती रायबोले तसेच कामोठे शहर अध्यक्षपदी विद्या तामखेड, उपाध्यक्ष नंदा गडवे आणि कळंबोली शहर अध्यक्षपदी प्रियंका पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्या आले.