नवी दिल्ली, 11 मे 2017:
तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात झाली आहे. पुढील सहा दिवस ही सुनावणी होणार असून शनिवार आणि रविवारीही या कामकाज होणार आहे. तिहेरी तलाक प्रथेविरोधात सात याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
तिहेरी तलाक पद्धतीला धर्माचे अधिष्ठान आहे का? तसे तो लागू करण्याचा मुलभूत अधिकार असतो का? याची तपासणी केली जाणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सरन्यायाधिश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या घटनापिठापुढे ही सुनावणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या पीठामध्ये हिंदू, मुस्लिम, पारसी, शीख आणि ख्रिश्चन अशा पाच धर्मांचे न्यायाधीश आहेत. तिहेरी तलाकबाबतच्या सुनावणीतून कोणत्या गोष्टी समोर येतात, याकडे साऱ्यांचे आता लक्ष लागले आहे.