पुणे, 8 मे 2017 /AV News Bureau:
पुणे येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणा-या नयना पुजारी हत्याकांडामध्ये तीन आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून त्यांच्या शिक्षेबाबात उद्या सुनावणी होणार आहे. मागील सात वर्षापासून हा खटला सुरू आहे. पुणे येथील शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयाने आज या आरोपींना दोषी ठरविले.
एका खाजगी कंपनीत काम करणा-या नयना पुजारीचे 7 ऑक्टोबर 2009 मध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी योगेश राऊत, राजेश चौधरी, महेश ठाकूर, विश्वास हिंदुराव या चौघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यातील राजेश चौधरी हा आरोपी माफिचा साक्षीदार झाला होता. त्यामुळे तिघांना दोषी ठरविण्यात आले आहे.