पनवेल, 4 मे 2017/AV News Bureau:
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज उद्यापासून दाखल करण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
यावेळी राज्यमंत्री व निवडणुक प्रभारी रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पनवेल महानगरपालिकेच्या पहिली वहिली सार्वत्रिक निवडणूक येत्या 24 मे रोजी होणार आहे. एकूण 20 प्रभागातील 78 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप, शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादीसह इतर पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतानाच आपल्या 26 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
भाजपला रोखण्यासाठी शेकाप, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आघाडी केली आहे. तर शिवसेनेने भाजपशी युती करण्याचे टाळले आहे. रिपाइं (आठवले गट) गट भाजपसोबत आहे. त्यात आता जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टीचीही भर पडली आहे.