देशात नवी मुंबई 8 व्या , पुणे 13व्या क्रमांकार, बृहन्मुंबई 29, ठाणे-116, पनवेल -170 वे
स्वच्छता सर्व्हेक्षणात महाराष्ट्रातील 44 शहरे आघाडीवर
नवी दिल्ली/ नवी मुंबई, 4 मे 2017/AV News Bureau:
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन – स्वच्छ् सर्व्हेक्षणअंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल 44 शहरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेने राज्यात व देशाच्या पश्चिम विभागात सर्वप्रथम क्रमांकाचा आणि देशात आठव्या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर स्वच्छतेच्या बाबतीत 29 व्या क्रमांकावर राहीले आहे. तर पुणे 13, ठाणे 116 तसेच पनवेल शहराने 170 वा क्रमांक पटकावला आहे. तर भुसावळ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे अस्वच्छ शहर ठरले आहे.
महाराष्ट्रातील 44 स्वच्छ शहरे आणि मिळालेले गुण
देशातील पहिली 10 स्वच्छ शहरे
देशातील पहिली 10 अस्वच्छ शहरे
सफाई कामगारांचे य़श
दरम्यान, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील तब्बल 44 शहरांनी स्वच्छ शहरांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. मात्र या स्वच्छतेमागील प्रमुख शिल्पकार असणारा सफाई कामगार मात्र अद्यापही संघर्ष करीत आहे. कंत्राटी पद्धती, आरोग्याच्या समस्या, सफाई कामगारांप्रती प्रशासन आणि नागरिकांची उदासिनता अशा अनेक आव्हानांचा सफाई कामगारांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा खराखुरा शिल्पकार असणाऱ्या सफाई कामगारांच्या हिताकडे सर्वाधिक प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. स्वच्छ शहराचा पुरस्कार घेण्यासाठी अधिकारी सुटाबुटात जातात. मात्र ज्या सफाई कामगारांमुळे स्वच्छतेचे पुरस्कार मिळत आहेत, त्यांना त्याचे संपूर्ण श्रेय देण्याची गरज आहे, हे नक्की.