पनवेल, 24 एप्रिल 2017/AV News Bureau:
पहिल्यांदाच होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. भाजपाकडून 78 जागांसाठी तब्बल 300 उमेदवारइच्छुक आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुक असल्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या नाराजांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
भाजपतर्फे निवडणूक लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये उच्चशिक्षित आहेत, व्यावसायिक आहेत, त्याचप्रमाणे महिला आणि तरूणांचे प्रमाणही मोठे आहे. मतदारांच्या आपल्या लोकप्रतिनिधीकडून जशा अपेक्षा असतात, तशाच पक्षनेतृत्वाच्याही आपल्या उमेदवाराकडून काही अपेक्षा असतात. त्यामुळे मतदारांच्या आणि पक्षनेतृत्वाच्या या एकत्रित अपेक्षांच्या निकषांवर योग्य त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती आ.प्रशांत ठाकूर यांनी दिली.