मुंबई, 20 एप्रिल 2017/AV News Bureau:
पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी 513 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या कामाला हिरवा कंदील दिला आहे.
पुणे-मिरज-कोल्हापू हा तब्बल 326 कि.मी. लांबीचा मार्ग मध्य रेल्वेच्या पुणे विभागात येतो. हा मार्ग प्रामुख्याने महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून जातो. या मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा सुधारणार आहे. तसेच पुणे-मिरज-लोंढा-हॉस्पेट- गुंटकल मार्गे दक्षिण (बेंगळुरू, चेन्नई)सह पश्चिम विभागातील (मुंबई, अहमदाबाद, सुरत, जयपूर, पुणे आदी) भागातील रेल्वे सेवा सुधारणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.