१५ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारणार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी  रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) आवाहन

मुंबई,2डिसेंबर 2016 /AV News Bureau :

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे. १५ डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी संविधान दिनाचे औचित्य साधून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. २६ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षाच्या आझाद मैदान येथील मध्यवर्ती कार्यालयातून उमेदवारी अर्जाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज भरून याच कार्यालयात जमा करायचे आहेत. इच्छुक उमेदवारांकडून 2 हजार रुपये शुल्क आकरण्यात येणार आहे.

१५ डिसेंबरनंतर वाढीव शुल्क

ज्या उमेदवारांना १५ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार नाहीत. त्यांना १५ डिसेंबरनंतर एक हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निर्णय घेण्यासाठी मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची जिल्हाध्यक्षांसह निवड समिजी स्थापन करण्यात येणार आहे, असे सोनवणे यांनी सांगितले.

निवडणुकीसाठी तयारी सुरू

मुंबई महापालिका निवडणूक ताकदीने लढण्यासाठी रिपाइंने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात आल्या असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.