नवी मुंबई, 10एप्रिल 2017/AV News Bureau:
कोकण विभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात आज केवळ २ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे अद्याप ३६ तक्रारी प्रलंबित आहेत.
कोंकण विभागीय लोकशाही दिन आज कोंकण भवनमध्ये विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात आली.
यावेळी उपायुक्त (सामान्य) शिवाजी कादबाने, उपायुक्त (पुरवठा) गीतांजली बावीस्कर तसेच विभागीय स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोंकण विभागीय स्तरावर आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात एकूण प्रलंबित अर्जांची संख्या 30 होती. आज निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या 2 आहे. आज आलेल्या अर्जांची संख्या 8 असून अद्याप एकूण 36 तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.