आरोग्य मंत्री दिपक सावंत यांचे प्रतिपादन
नवी मुंबई, 10 एप्रिल 2017/AV News Bureau:
स्वमग्न मुलांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्राधान्याने लक्ष घालणार आहे. ज्या संस्था या प्रश्नावर काम करत आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकार सहाय्य करेल असं आश्वासन आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी दिले. नवी मुंबईतील न्युरोजन रुग्णालयाच्यावतीने स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचं उदघाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतचं करण्यातं आले त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रात स्वमग्न मुलांच्या प्रश्नावर काम करणा-या संस्थांच्या अडचणी समजून घेण्यासाठी लवकरच या संस्थांना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे . स्वमग्न मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्याबाबतही चाचपणी केली जाणार असल्याचही त्यांनी सांगितलं. यावेळी रूग्णालयाचे संचालक डॉ. आलोक शर्मा, वैद्याकीय अधिकारी डॉ. नंदिनी गोकुळचंद्रन आदि उपस्थित होते.
www.autismconnect.com ही ऑटीझम पोर्टल असलेली साईट आहे. या वेब साईटच्या मदतीने ऑटीझम सबंधित सर्व माहिती नागरिकांना मोफत आणि विस्तृत स्वरुपात उपलब्ध आहे. ऑटीझम झालेल्या अशा मुलांची कशी काळजी घ्यावी आणि कोणती उपचार पद्धती उपलब्ध आहे याबाबत महिती दिली आहे.