नवी दिल्ली, 30 मार्च 2017:
सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकरीसाठीची वयोमर्यादा विधवा, घटस्फोटित महिला आणि विभक्त महिलांसाठी 35 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी ही वयोमर्यादा 40 वर्षे इतकी असून “क” आणि “ड” श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी ही तरतूद 1980 सालापासून अस्तित्वात असल्याचे कर्मचारी, तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
“अ” आणि “ब” श्रेणीच्या नोकऱ्यांसाठीही वयोमर्यादेत ही शिथिलता 1990 सालापासून दिली जाते. मात्र त्यात स्पर्धा परिक्षांद्वारे थेट घेतल्या जाणाऱ्या उमेदवारांचा समावेश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.