कोल्हापूरचे कृषी महाविद्यालयचे नामकरण छ. शाहू महाराज कृषी महाविद्यालय

मुंबई, 29 मार्च २०१७/AV News Bureau:

कोल्हापूर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, कोल्हापूर या महाविद्यालयाचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर असे करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे समाजसुधारक होते. समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्ये केली. त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कार्याचा विचार करुन या महाविद्यालयाचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर असे केले आहे, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.