नवी मुंबई, 29 मार्च 2017 /AV News Bureau:
उलवे नोड येथील सेक्टर 19 येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर आज सिडकोच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली.
या मोहिमे अंतर्गत उलवे नोडमधील सेक्टर 19 येथील 200 अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यात आली असून 2 किलोमीटरचा रस्ता मोकळा करण्यात आला. त्याचप्रमाणे भूमीपूत्र भवनसमोरील मटन शॉप आणि कॅटीन या दोन अनधिकृत दुकानांवर कारवाई करुन 200 चौ.मी क्षेत्रफळाची जागा रिकामी करण्यात आली. सदर बांधकामे सिडकोतर्फे कोणताही विकास परवाना न घेता सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असल्याने सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली.
उलवेतील नोडमधील अभियंत्रिकी विभागाकडून अतिक्रमण हटविण्याविषयी सतत तक्रारी दाखल होत होत्या .