नवी मुंबई,24 मार्च 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली. त्यांच्याजागी एस. रामास्वामी हे नवी मुंबई आयुक्त म्हणून रुजू होणार आहे.
मुंडे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावली होती. महापालिका प्रशासनाच्या विविध खात्यांमध्ये असलेल्या अनियमितपणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली. मुंढे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांना लक्ष्य केल्यामुळे राजकारण्यांशी त्यांचे संबंध चांगलेच बिनसले. त्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांनी मुंढे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविला होता. तेव्हापासूनच मुंढेच्या बदलीची चर्चा सुरू झाली होती.