सीवूड्स मॉलमधील विविध कंत्राटांचा मुद्दा
नवी मुंबई,24 मार्च 2017/AV News Bureau :
सीवूड्स येथील सेंट्रल मॉलमधील कंत्राटे मिळावीत यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या वादातून शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत तांडेल यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस इंटकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सीवूड्स येथील सेंट्रल मॉल लवकरच सुरू होणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात विविध कामे आणि हाउसकिपिंगच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या कामांची कंत्राटे आपल्याला मिळावीत, यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मॉलमधील कामे सर्व गरजूंना मिळावीतअशी मागणी मिळावीत यासाठी इंटकचे रवींद्र सावंत एल अण्ड टी च्या अधिकाऱ्यांना भेटले होते. त्यावर शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत तांडेल यांनी आपल्याला फोनवरून शिविगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रवींद्र सावंत यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात केली आहे. नेरुळ पोलिसांनी रवींद्र सावंत यांच्या तक्रारीवरून गुरुवारी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.