मुंबई, 23 मार्च 2017/AV News Bureau:
राज्यातील औषधे विक्री दुकानांमध्ये फार्मासिस्टचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून बी. फार्मच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ‘कमवा शिका योजनें’तर्गत या दुकानांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी आज विधानसभेत दिली.
गरजूंना योग्य औषध देणे महत्वाचे असते, अन्यथा ते रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. औषधे विक्री दुकानांमध्ये प्रशिक्षीत फार्मासिस्ट असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या दुकानांमध्ये असे प्रशिक्षीत फार्मासिस्ट नसतील त्या औषध दुकानांवर कारवाई करण्यात येईल,असे बापट यांनी सांगितले.
महेश चौघुले, आशिष शेलार, योगेश सागर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.