मुंबई, 30 नोव्हंबर 2016/अविरत वाटचाल न्युज ब्युरो (Av news)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2017 मध्ये घेण्यात येणा-या परीक्षांचे वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहे.
परीक्षेचे नांव, जाहिरातीची तारीख, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेची तारीख याबाबत तपशिलवार वेळापत्रक अनुक्रमे पुढीलप्रमाणे.
- तांत्रिक सहाय्यक परिक्षा 2016 ची मुख्य परिक्षा 15 जानेवारी 2017.
- विक्रीकर निरीक्षक परिक्षा 2016 ची पूर्व परिक्षा 29 जानेवारी तर मुख्य परिक्षा 28 मे 2017.
- राज्यसेवा परीक्षा 2017 ची जाहिरात डिसेंबर, 2016 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा 2 एप्रिल तर मुख्य परीक्षा 16,17,18 सप्टेंबर, 2017 अशी तीन दिवस.
- पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात जानेवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा 12 मार्च तर मुख्य परीक्षा 11 जून, 2017.
- सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2017 ची जाहिरात जानेवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा 30 एप्रिल तर मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट, 2017.
- लिपिक टंकलेखक परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारी,2017 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा 14 मे तर मुख्य परीक्षा 3 सप्टेंबर, 2017 .
- दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा 21 मे तर मुख्य परीक्षा 8 ऑक्टोबर, 2017.
- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा 2 जुलै तर मुख्य परीक्षा 15 ऑक्टोबर 2017.
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात मार्च, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा 4 जून तर मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर, 2017 .
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2017 ची जाहिरात मार्च, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा 9 जुलै. त्यापैकी महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017 व महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परिक्षा 2017 या 26 नोव्हेंबरला तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017,ही 17 डिसेंबर, 2017 आणि महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017 ही 24 डिसेंबर, 2017 रोजी .
- सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा 25 जून रोजी.
- सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 16 जुलै, 2017 रोजी होईल. त्यापैकी पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा 2017, 5 नोव्हेंबरला 2017, सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2017, 10 डिसेंबर, 2017 रोजी, विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017, 7 जानेवारी,2018 रोजी होईल.
- कर सहायक परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा 20 ऑगस्ट तर मुख्य परीक्षा 31 डिसेंबर, 2017 रोजी.
- महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा 30 जुलै तर मुख्य परीक्षा 17 डिसेंबर, 2017 रोजी .
- विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात सप्टेंबर, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा 5 नाव्हेंबर,2017 रोजी होईल.
या परिक्षांबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळांस भेट द्यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबईचे अवर सचिव यांनी कळविले आहे.