नवी दिल्ली, 21मार्च 2017:
केंद्र सरकारी कर्मचारी गट विमा योजनेअंतर्गत जमा झालेला निधी योग्य वेळी आणि तातडीने कर्मचाऱ्यांमध्ये वितरीत करण्यात यावा, अशी सूचना अर्थ मंत्रालयाने संबंधित खात्याला दिली आहे. याबाबतचा आदेश 17 मार्च 2017 रोजी अर्थ खात्याने जारी केला आहे.
केंद्र सरकारी कर्मचारी गट विमा योजनेअंतर्गत जमा झालेला निधी कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या वेळी दिले जातात. दुर्दैवाने कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबियांना या विम्याचे पैसे मिळतात. कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करुन 1980 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गट विमा योजना सुरु करण्यात आली आहे.