मतदारयादीवर ऑफलाईन सुद्धा आक्षेप नोंदवता येणार : नव्या आयुक्तांचे स्पष्टीकरण
पनवेल,16 मार्च 2017/AV News Bureau:
पनवेल महापालिकेतर्फे प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीत घोटाळा झाला असल्यामुळे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र नवनियुक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे एकूण १७मार्चला चर्चेसाठी बोलावले आहे. त्यामुळे उपोषण तूर्त मागे घेण्यात आल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली.
पनवेल महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये ८ हजार मतदार गायब झाल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. प्रभाग रचनेपासून घोळ सुरु झालेला असून प्रभागातील मतदार गायब होऊन तिसऱ्याच प्रभागात त्यांची नोंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या गंभीर प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी यासाठी उपोषण सुरु केले होते. उपोषणकर्त्यांना आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी चर्चेला बोलावले.यावेळी युवानेते परेश ठाकूर,जिल्हा भाजप प्रवक्ते वाय टी देशमुख,तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, सुशिला घरत, सी.सी. भगत,माजी नगरसेवक अनिल भगत,मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी हे उपस्थित होते.