अविरत वाटचाल विशेष : ग्राहकांचे हित आणि संरक्षण !

 

सिद्धार्थ हरळकर/AV News

नवी मुंबई,15 मार्च2017:

  • 15 मार्च जगभरात ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ठाणे जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहा म्हात्रे यांनी अविरत वाटचाल न्यूजशी केलेली विशेष बातचीत…

कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी केली की आपण ग्राहक होतो. मात्र खरेदी केल्यानंतर आपण फसवले गेल्याचे लक्षात येते. तेव्हा या फसवणुकीबाबत कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न तयार होतो. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक कायदा आणि त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांची फसवणूक होवू नये आणि ग्राहक राजा स्वतःच्या हक्कांविषयी जागृत व्हावा. त्याला कायद्याचे संरक्षण मिळावे म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत देशात विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 40 ग्राहक मंच(Consumer Courts) कार्यरत असून ग्राहकांच्या विविध तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय देण्यात येतो. याबाबातची अधिक माहिती जाणून घेऊया स्नेहा म्हात्रे यांच्याकडून…

न्यायालयाच्या एखाद्या निर्णयाबाबत समाधान न झाल्यास सर्वाच्च न्यायालयात दाद मागता येते त्याचप्रमाणे ग्राहकांसाठीही न्यायालयांचे स्तर बनविण्यात आले आहेत ते म्हणजे –

  1. राज्यस्तरीय – राज्य आयोग ग्राहकांचे हक्क जोपासण्यासाठी व त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यरत आहे.
  2. राष्ट्रीय स्तरावर – राज्य आयोगाकडे समाधान न झाल्यास ग्राहक राष्ट्रीय आयोगाकडे आपली तक्रार मांडू शकतो
  3. सर्वोच्च न्यायालय – ग्राहकांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या निकालाने समाधान न झाल्यास सर्वोच्च न्यायालयातही दाद मागता येते.

 विविध क्षेत्रांत ग्राहकांची पिळवणूक अथवा फसवणूक केली जाते. त्याबाबतचे दावे दाखल ग्राहकमंचात दाखल होतात. उदा.

  • बॅंकेकडून मिळणाऱ्या सदोष सेवेबद्दल तक्रारी.
  • बिल्डर्सविरोधात सदोष बांधकाम अथवा अग्रीमेंट करून ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात सदनिकेबाबतचे पैसे घेवूनही त्या सदनिकेचा ताबा ग्राहकाला न दिल्याने झालेली फसवणुकीच्या तक्रारी.
  • ऑनलाइन खरेदी.
  • विविध ग्राहकोपयोगी उत्पादने.
  • इन्शुरन्स कंपन्या व त्यांच्या एजंटकडून ग्राहकांची फसवणूक झाली असल्यास त्यासंदर्भातील तक्रारी.
  • ट्रॅव्हलिंग, हॉटेलिंग, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील ग्राहकांच्या फसवणुकीबाबतच्या अथवा सदोष सेवा दिल्याबद्दलच्या तक्रारी. याबाबतची अधिक माहिती-

 

खोट्या जाहिराती तसेच एखाद्या सेवेसाठी दुसऱ्या सेवेची सक्ती करणे हेदेखील गैर आहे. त्यामुळे सेवा लादणाऱ्या तसेच फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे ग्राहक मंचाला अधिकार आहेत. त्याबाबत अधिक माहिती –