मुंबई, 13 मार्च 2017/
नोटाबंदीच्या काळात एटीएममधून पैसे काढण्यावर घातलेले रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध मागे घेतले आहेत. आजपासून एटीएममधून हवे तेवढे पैसे काढण्यात येणार आहे.
काळयै पैशाळा आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले होते. नोटाबंदीच्या काळात एटीएमधून तसेच बॅंक खात्यातून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्याचा मोठा फटका नागरिकांना बसला होता. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून 13 मार्चपासून एटीएम तसेच बचत खात्यातून पैसे काढण्याच्या मर्यादा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला हवे तेवढे पैसे काढणे आता शक्य होणार आहे.