मुंबई,10 मार्च 2017:
शासकीय रक्तपढीतील रक्त पिशवीचा दर 450 रुपयांवरून 850 रुपये तर खासगी रक्तपेढीतील रक्त पिशवीचा दर 1450 रुपये एवढी वाढ झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली.
शासकीय रक्तपेढीतील रक्त पिशवीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र रक्त पिशवीच्या दरात वाढ करण्याचे अधिकार राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद नवी दिल्ली यांच्याकडे असल्याचेही डॉ. सावंत यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. विधान परिषद सदस्य अनिल परब यांनी रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत वाढ झाल्याबाबतचा तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.