सीआरझेड मंजूरीसाठी पर्यावरण मंत्रालयाचे पोर्टल

 

नवी दिल्ली, 9 मार्च 2017:

सीआरझेड अर्थात किनारी नियमन क्षेत्रात मंजुरी मिळवण्याकरिता पर्यावरण मंत्रालयाने गुरुवारी नवीन वेब पोर्टल सुरू केले.  पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनिल दवे यांनी या पोर्टलचे उद्घाटन केले.

सीआरझेड मंजुरीच्या प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गती वाढवणे हा या वेबपोर्टलचा हेतू असून ते वापरण्यास सुलभ आहे. इंटरनेटची सुविधा असलेल्या कुठल्याही संगणकावरुन ते वापरता येईल.

एक खिडकी असणाऱ्या या पोर्टलमुळे संबंधितांना सीआरझेडबाबत तातडीने माहिती मिळवणे सोपे जाणार आहे. या पोर्टलमुळे सीआरझेड मंजूरी प्रस्तावांची एकूण स्थितीचे अवकलोकन करणे नागरिकांना शक्य होणार आहे.  http://environmentclearance.nic.in/ या संकेतस्थळावर सीआरझेड मंजूरीबाबत माहिती मिळू शकेल.