ठाणे, 10 मार्च 2017/AV News Bureau:
स्टेम प्राधिकरणाकडून होणारा ठाणे शहराचा पाणी पुरवठा आज, 10 मार्च रोजी सकाळी 9 ते शनिवार, 11 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
- शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत
शहरातील घोडबंदर रोड, गांधीनगर, वसंतविहार, उन्नति गार्डन, सुरकरपाडा, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादि परिसरात पाणी पुरवठा बंद राहिल.
- शुक्रवारी रात्रौ 9 ते शनिवार सकाळी 9 पर्यंत
समतानगर, ऋतुपार्क, सिध्देवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.