मुंबई, 8 मार्च 2017/AV News Bureau:
सैनिकांच्या पत्नींविषयी अवमानकारक विधान केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचालक यांचे निलंबन करण्यात यावे असा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.
सभागृहामध्ये याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी सात सदस्यांची सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याची विनंती सभागृहाला केली आहे. ही समिती आमदार परिचालक यांचे वक्तव्य तपासून बघणार आहे. या समितीचा अहवाल अधिवेशन संपेपर्यंत येईल. मात्र तोपर्यंत आमदार परिचालक यांचे निलंबन करण्यात येईल. उद्या तसा ठराव माडण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.