दुग्ध व्यवसायीसाठीचे साहित्य, संरक्षित शेतीसाठीचे साहित्य यांचा समावेश
मुंबई, 7 मार्च 2017/AV News Bureau:
विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण, रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने 18 अतिरिक्त वस्तूंचा समावेश करण्याचा निर्णय वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
या निर्णयानुसार कृषी निविष्ठा, भूसुधारके, सूक्ष्म सिंचने साधने, शेळया, मेंढया व कोंबडया व त्यांचे संवर्धनासाठीचे साहित्य, दुग्ध व्यवसायीसाठीचे साहित्य, संरक्षित शेतीसाठीचे साहित्य, अच्छादन व अस्तरीकरण साहित्य, एकात्मिक कीड व अन्न व्यवस्थापन साठीच्या निविष्ठा, कृषी प्रक्रियेसाठीचे साहित्य व उपकरणे, रेशीम उत्पादनासाठीचे साहित्य व उपकरणे, कृषी माल हाताळणी व वाहतूक सामग्री, आवेष्टन, संकलन व प्रतवारी उपकरणे, स्वेटर, शाल, साबण, हेअर ऑईल, झेरॉक्स मशिन, टिनपत्रे या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेमुळे तसेच वस्तूंच्या गुणवत्तेबाबत निर्माण होणाऱ्या बाबी, अनियमितता या पार्श्वभूमीवर थेट लाभ हस्तांतरण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.