नवी मुंबई,6 मार्च 2017/AV News Bureau:
नवी मुंबई शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात पालिका प्रशासन आक्रमक झाली आहे. या मोहिमेअंतर्गत आता पालिकेकडे बेकायदेशीर अशी नोंद असणाऱ्या धार्मिक स्थळांकडे अतिक्रमण विभागाचा मोर्चा वळला असून तब्बल 441 धार्मिक स्थळांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या धार्मिक स्थळांबाबत येत्या मे अखेरपर्यंत अंतिम निर्णय होणार असून ती तोडली जाण्याची दाट शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिकेकडे उपलब्ध अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती
महापालिका प्रशासनाकडे शहरातील 483 अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी उपलब्ध आहे. यापैकी 31 डिसेंबर 2016 पर्यंत 22 धार्मिक स्थळे नियमित करण्यात आली आहेत. तर उर्वरित 441 धार्मिक स्थळांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत ही बांधकामे निष्कासित करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र आता महापालिका प्रशासनाने मे अखेरपर्यंत या 441 धार्मिक स्थळांबाबत अंतिम निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे. ही धार्मिक स्थळे नियमित वा स्थलांतरीत करता आली नाही तर त्यांच्यावर मे अखेरपर्यंत तोडण्याची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.