31मार्चपर्यंत मोबाइल बॅंकिंग सुविधा द्या

mobile

केंद्र सरकारचे बॅंकांना आदेश

नवी दिल्ली, 2 मार्च 2017

देशात जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार व्हावेत हे केंद्र सरकारचे प्रमुख उद्दीष्ठ आहे.यादृष्टीने बॅंकांनी आपल्या सर्व ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मोबाइल बॅंक सुविधा उपलब्ध करून द्यवी, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन यांनी बुधवारी नवी दिल्लीत याची माहिती दिली.

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वच बॅंकांना पुढाकार घेण्यास सांगितले आहे. तसेच जे ग्राहक यु पी आय किंवा भीम अपचा उपयोग करीत आहेत, ते थेट मोबाइल बॅंकिंगशी जोडले जाणार आहेत.