नानासाहेब प्रतिष्ठानाचे विक्रमी स्वच्छता अभियान

nana 1

नवी मुंबई,1 मार्च 2017/AV News Bureau:

महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत बुधवारी 1 मार्चला  धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने संपूर्ण भारतभर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

  • 1 लाख 41 हजारहून अधिक सेवकांचा सहभाग

पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील 3 हजार 270 ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत देशभरातील 1लाख 41हजार 594 सदस्य सहभागी झाले होते.

  • स्वच्छता मोहिमेची व्याप्ती

nana - swachhata

या देशव्यापी स्वच्छता मोहिमेअंतर्गत 4 हजार 283 किलो मीटरचा परिसर स्वच्छ करण्यात आला.  देशभरातील 546 गावे, 180 शहरे, 53 जिल्हा व 115 रेल्वे स्थानक परिसरात ही मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत 27973 टन कचरा जमा करण्यात आला.