आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल,28 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
भाजपाचे संघटन रायगड जिल्ह्मात अधिक सक्षम करून जिल्ह्मातील सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत राहणार आहे, असे प्रतिपादन भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले
नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे 3 जिल्हा परिषद व 09 पंचायत समिती सदस्य निवडून आले. गेल्या 5 वर्षापूर्वी भाजपाचा केवळ 1 जि. प. व 2 पं. स. सदस्य होते या तुलनेत आज भाजप वाढत आहे. रायगड जिल्ह्मात पहिल्यांदाच भाजपाची कमळ निशाणी घेऊन जिल्हा परिषदेचे 40 व पंचायत समितीचे 82 उमेद्वार उभे राहिले होते. जिल्ह्याच्या बहुतांश ग्रामीण भागात भाजपाचे कमळ पोहोचले असून काही जागांवर पक्षाला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे,असे ठाकूर यांनी सांगितले.
रायगड जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष कोण होणार याची उत्कंठा एकीकडे शिगेला पोहोचली आहे. मात्र अध्यक्षपद प्राप्त करण्यासाठी वेगवेगळी राजकीय समीकरणे आखली जात आहे. मात्र भाजप कोणाच्याही मागे फरफटत न जाता जिल्ह्मातील जनतेच्या विकासासाठी कटीबध्द राहून स्वतंत्रपणाने काम करत राहणार आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.