सायबर क्राइम, स्ट्राँग सिटी नेटवर्कबाबत अमेरिकेचे सहकार्य

State Min. Dr. Patil with American Consulate General visit

गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची माहिती

मुंबई, 27 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

सायबर गुन्हे रोखणे तसेच स्ट्रॉंग सिटी नेटवर्कबाबत महाराष्ट्र शासन व अमेरिकन दूतावास यांच्यात सकारात्मक चर्चा झाली  आहे. या क्षेत्रात महाराष्ट्राला अमेरिकेचे सहकार्य मिळणार असल्याची माहिती गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत टॉम वाजदा, अमेरिकेचे मुंबईतील राजकीय व आर्थिक विभागाचे प्रमूख ख्रिस ग्रॉसमन, अमेरिकेचे मुंबईतील विभागीय सुरक्षा अधिकारी केविन इर्विन, अरुंधती मुंडले आदींनी आज गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे होणारे आर्थिक गुन्हे रोखण्यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळेच अमेरिकेचे या क्षेत्रातील सहकार्य महत्वाचे ठरेल, असे राज्यमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सायबर गुन्हे रोखणे तसेच स्ट्रॉंग सिटी नेटवर्कबाबत अमेरिका सदैव सहकार्य करेल, असे वाजदा यांनी दिली.