नवी मुंबई, 27 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत 16ते 28फेब्रुवारी या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पेट्रोल पंपस्, उड्डाणपूल ,ब्रीज, राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी विशेष स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.या कार्यक्रमाअंतर्गत 25 फेब्रुवारीला बेलापूर विभागातील उरणफाटा, अपोलो हॉस्पिटल जवळील पेट्रोल पंप येथे विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये पेट्रोल पंप व परिसर तसेच पेट्रोल पंपासमोरील महामार्गावर विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये स्वच्छता निरिक्षक सुभाष म्हसे, स्वच्छता निरिक्षक मिलींद तांडेल व स्वच्छता दूत तसेच पेट्रोल पंपावरील कर्मचारी सहभागी झाले होते.
सदर पंधरवडा मोहिमेमध्ये शहरात विविध ठिकाणी पेट्रोप पंपांजवळ सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे व प्लास्टिकचा वापर न करणे याबाबत जनजागृतीसाठी होर्डिंगज् बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपांजवळील शौचालयांची पाहणी करण्यात आली असून शौचालयांजवळ व महामार्गालगत आवश्यकतेनुसार कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उप आयुक्त तुषार पवार, परिमंडळ-1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ-2चे उप आयुक्त अंबरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.