मुंबई, 23 फेब्रुवारी 2017/AV News Bureau :
राज्यातील १० महानगरपालिका आणि 25 जिल्हापरिषदा व त्यांतर्गतच्या 283 पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल आता काही तासांतच लागणार आहे. गेले महिनाभर सुरू असलेल्या रणधुमाळीचा शेवट 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानाने झाला होता. प्रमुख पक्षांच्या आघाडी, युती तुटल्यामुळे स्वबळावर लढणाऱ्या शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेसह प्रमुख पक्षांपैकी जनतेचा कौल कुणाला मिळणार आणि राज्याच्या राजकारणावर आपली छाप कोण सोडणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकीत झालेले मतदान
महानगरपालिका निवडणूक दृष्टिक्षेप
- महानगरपालिकांची संख्या- 10
- एकूण लोकसंख्या- 2,57,19,093
- एकूण प्रभाग- 490
- एकूण जागा- 1,268
जिल्हा परिषद निवडणूक दृष्टिक्षेप
- जिल्हा परिषदांची संख्या- 25
- एकूण लोकसंख्या- 5,09,37,606
- एकूण जागा- 1,510
पंचायत समिती निवडणूक दृष्टिक्षेप
- पंचायत समित्याची संख्या- 283
- एकूण लोकसंख्या- 5,06,56,373
- एकूण जागा- 3,000