मालकांना 31 मार्चपर्यंतची मुदत
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2017:
कर्मचारी निवृत्ती वेतन निधीने कर्मचारी नोंदणी 2017 सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कर्मचारी निवृत्ती वेतन निधीचे फायदे न मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची विस्तृत माहिती स्वेच्छेने देण्याची संधी मालकांना उपलब्ध होणार आहे. ही मोहीम 1 जानेवारी 2017 ते 31 मार्च 2017 दरम्यान कार्यान्वित राहील.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने या योजनेअंतर्गंत ऑनलाईन माहिती जाहीर करण्याची सुविधाही सुरु केली आहे. अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक यांचे आधार कार्ड सादर करण्यात आले आहे.
संगणकीकरणाच्या पुढील टप्प्यात कर्मचारी निवृत्ती वेतन निधी केंद्रभूत पावती आणि देयक प्रणाली विकसित करणार आहे.