युवकांनी नोकरीऐवजी शेती उद्योगांकडे वळावे

yb

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठीचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे आवाहन

 नाशिक, 16 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

भारताची अर्थव्यवस्था ग्रामीण भागावर अवलंबून असून, शेतकरी या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, शेतीवर आधारितउद्योगधंदे वाढीस लागणे काळाची गरज आहे. युवकांनी नोकरीमागे न धावता शेती आधारित उद्योगांना प्राधान्य द्यावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान केंद्रामार्फत ‘जनावरांचे आरोग्य व्यवस्थापक’ आणि ‘आळंबी उत्पादन’ या दोन विषयावर आजपासून प्रत्येकी ३० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील आणि आडगाव येथील पशुधन व्यवस्थापन पदविका विद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर हे होते.