मुंबई – 16 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
शेतीमालाला हमीभाव नाही, नोटाबंदीमुळे शेतमजुरांना मजुरी देता आली नाही म्हणून नैराश्यातून येवला तालुक्यातील शेतकऱ्याने आपले पाच एकर कांद्याचे पीक जाळून टाकले.शेतकऱ्यांच्या या स्थितीला केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले.
शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तत्काळ कर्जमाफीची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करावी तसेच शेतमालाला उत्पादन खर्चाच्या अधिक ५०% इतका हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे यांनी केली.