पुणे-नागपूर-पुणे विशेष उन्हाळी 22 गाड्या
मुंबई, 16 फेब्रुवारी 2017/AV News Bureau :
उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर 56 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांसोबत पुणे-नागपूरदरम्यानही 22 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. यामध्ये सीएसटी-सावंतवाडी रोड साप्ताहिक, लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड साप्ताहिक, लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी वातानुकूलित साप्ताहिक या कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आणि पुणे-नागपूर या उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
- सीएसटी-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (एकूण 18 गाड्या अप -डाउन)
- 01001 ही विशेष गाडी 7 एप्रिल ते 2 जून या काळात प्रत्येक शुक्रवारी ( 9 गाड्या)सकाळी 11.55 ला सीएसटी स्थानकातून सुटून त्याच दिवशी रात्री 11 वाजता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात पोहोचेल.
- 01002 ही विशेष गाडी 8 एप्रिल ते 3 जून या काळात प्रत्येक शनिवारी ( 9 गाड्या)दुपारी 12 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून त्याच दिवशी रात्री 10.55 ला सीएसटी स्थानकात पोहोचेल .
- गाडीचे थांबे – दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.
- गाडीचे डबे – या विशेष गाड्यांना 10 डबे दुसऱ्या दर्जाचे चेअर कार आणि 10 डबे दुसऱ्या श्रेणीचे असणार आहेत.
- लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (एकूण 20 गाड्या अप -डाउन)
- 01045 ही विशेष गाडी 1एप्रिल ते 3 जून या काळात प्रत्येक शनिवारी (10 गाड्या)सकाळी 5.33 ला एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात पोहोचणार आहेत.
- 01046 ही विशेष गाडी 2 एप्रिल ते4 जून या काळात प्रत्येक रविवारी ( 10 गाड्या) दुपारी 12 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून त्याच दिवशी रात्री 11.45 ला एलटीटी स्थानकात पोहोचेल .
- गाडीचे थांबे –ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावरडे, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.
- गाडीचे डबे – या विशेष गाड्यांना 10 डबे दुसऱ्या दर्जाचे चेअर कार आणि 10 डबे दुसऱ्या श्रेणीचे असणार आहेत.
- लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी वातानुकूलित साप्ताहिक विशेष (एकूण 18 गाड्या अप -डाउन)
- 02005 ही वातानुकूलित विशेष गाडी 7 एप्रिल ते 2 जून या काळात प्रत्येक शुक्रवारी (9 गाड्या) पहटे 1.10 ला एलटीटीहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजता करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
- 02006 ही विशेष गाडी 7 एप्रिल ते 2 जून या काळात प्रत्येक शुक्रवारी ( 9 गाड्या) दुपारी 12 वाजता करमाळी येथून सुटून त्याच दिवशी रात्री 11.50 ला एलटीटी स्थानकात पोहोचेल .
- गाडीचे थांबे –ठाणे, पनवेल, रोहा, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.
- गाडीचे डबे – 1 प्रथम श्रेणी वातानुकूलित , 2 वातानुकूलित 2 टायर, 8 वातानुकूलित 3 टायर आणि वातानुकूलित पेन्ट्री कार असे डबे असणार आहेत.
- पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाड्या (11)
- 01029 ही साप्ताहिक विशेष गाडी 8 एप्रिल ते 17 जून या काळात प्रत्येक शनिवारी (11 गाड्या) पहाटे 5.15 ला पुण्याहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजता नागपूर रेल्वे स्थानकात पोहोचेल. ही गाडी दौंड,अहमदनगर,बेलापुर,कोपरगाव,मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापुर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी या स्थानकांवर थांबेल. या गाडीला 8 डबे दुसऱ्या दर्जाचे चेअर कार आणि 2 डबे दुसऱ्या श्रेणीचे असणार आहेत.
- नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी (11)
- 01030 ही विशेष गाडी 7 एप्रिल ते 16 जून या काळात प्रत्येक शुक्रवारी ( 11 गाड्या) सकाळी 9.20 ला नागपुर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2.46 ला पुणे स्थानकात पोहोचेल . ही गाडी अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि लोणावळा या स्थानकांवर थांबेल. या गाडीला 8 डबे दुसऱ्या दर्जाचे चेअर कार आणि 2 डबे दुसऱ्या श्रेणीचे असणार आहेत.